
श्री धारावी देवी माता, एक जागृत देवस्थान व एक ऐतिहासिक मंदिर
तारोडी, भाईंदर पश्चिमेला डोंगरात श्री धारावी देवीचे इतिहासकालीन मंदिर आहे. धारावी बेटात निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले धारावी मातेचे मंदिर भक्तांना नेहमीच साद घालते. सदर मंदिराच्या स्थापनेविषयी नेमकी माहिती नसली तरी हे मंदिर पेशवेकाळाच्याही आधी बांधलेले आहे. चिमाजी अप्पांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या जोरावर वसईला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी वसई किल्ल्यावर आक्रमण करण्यापुर्वी श्री धारावी मातेचे दर्शन घेतले होते. इंग्रजाच्या राजवटीत दि. १० सप्टेंबर १८६७ रोजी, मुबंई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर श्री. रॉबर्ट आर्ट साहेब यांनी सनद लिहून दिलेली आहे त्यात मातेच्या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी प्रतिवर्षी रु. १५/- मंजुर केले होते. दिवाबत्तीची रक्कम त्याकाळी कस्टम अधिकाऱ्यांकडे देण्यात येत होती.
सर्व देणगीदारांच्या मनःपूर्वक आभार
सर्व प्रवासाचा अनुभव घ्या आमच्या दैनंदिन विधीद्वारे
सकाळच्या अभिषेकात, भक्तगण देवतेच्या मूर्तीवर पवित्र जलाचा अभिख, शांती आणि समृद्धीची कामना करतात.
देवतेच्या मानाने आरती केली जाते. या विधीत, भक्तगण एकत्र येऊन देवतेच्या स्तुतीसात्र येऊन शांती, प्रेम आणि समर्पणाची भावना अनुभवतात.
भक्तांसाठी मंदिर उघडले जाते. नैवद्य म्हणजे देवतेस अर्पकरतात. या क्षणी, भक्तांच्या मनात शांती आणि संतोषाची भावना असते.
देवतेच्या मानाने आरती केली जाते. या विधीत, भक्तगण एकत्र येऊन देवतेच्या स्तुतीसात्र येऊन शांती, प्रेम आणि समर्पणाची भावना अनुभवतात.
पूजा आणि आरती बुकिंग
धारावी देवीच्या दिव्य आशीर्वादांचा अनुभव घेण्यासाठी पूजा किंवा आरती बुक करा. आमच्या समर्पित सेवांमुळे प्रत्येक विधी अत्यंत भक्तिभाव आणि काळजीने पार पडतो.
तुम्हाला अभिषेक किंवा विशेष पूजा बुक करायची असल्यास, आमचे सेवाकारी तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. विश्वास आणि भक्ती साजरी करण्यासाठी आमच्यात सामील व्हा.